Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधींना न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

गुजरात न्यायालयाने आज काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे
Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधींना न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

'मोदी' या आडनावावरून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. देशातील राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्यांनतर त्यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१९मध्ये झालेल्या निवडणुकीच्या कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टीका केला होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी राहुल गांधींनी जामीनासाठी त्वरित अर्ज केला. यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात येणार का? असा प्रश्नदेखील विचारण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in