मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींची शिक्षा कायम! गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

राहुल गांधी यांना सुनावलेली २ वर्षाची शिक्षा कायम राहणार
मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींची शिक्षा कायम! गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
Published on

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरु आहे. सुरत न्यायालयाने राहुल यांना याप्रकरणी दोषी ठरवत २३ मार्च रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. राहुल यांनी याविरोधात गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. याप्रकरणावर शुक्रवारी(७ जुलै) गुजरात उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.

गुराज उच्च न्यायालयात राहुल गांधी यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सुनावलेली २ वर्षाची शिक्षा कायम राहणार आहे. तसंच यााच परिणाम म्हणून राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारीचा निर्णय तसाच राहणार आहे. हा राहुल गांधी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शुक्रवार (७ जुलै) रोजी झालेल्या सुनावणीत गुजरात हायकोर्टाने म्हटले की, सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवण्या आदेश योग्य आहे. यात आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. यावेळी राहुल गांधी यांच्यावर जवळपास १० गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याचं देखील गुजरात न्यायालयाने म्हटलं आहे.

काय आहे मोदी आडनाव प्रकरण ?

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी "मोदी हेच सर्व चोरांचे आडनाव आहे", असं विधान केलं होतं. भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या या विधानाच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी त्यांच्या वत्तव्यातून मोदी आडनावाच्या लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्णेश यांनी केला होता.

logo
marathi.freepressjournal.in