गुजरातचे अपक्ष आमदार धर्मेंद्रसिंह वाघेला यांचा भाजपमध्ये परतण्यासाठी आमदारकीचा राजीनामा

वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वाघेला यांनी असा दावा केला
गुजरातचे अपक्ष आमदार धर्मेंद्रसिंह वाघेला यांचा भाजपमध्ये परतण्यासाठी आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद : अपक्ष आमदार धर्मेंद्रसिंह वाघेला यांनी गुरुवारी गुजरात विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि लवकरच आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली.  

वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वाघेला यांनी असा दावा केला की, आपल्या राजीनाम्यामागील उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हात बळकट करण्यासाठी देशात ‘रामराज्य’ स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा आहे.

वाघेला हे २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या तीन अपक्ष उमेदवारांपैकी एक आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भारतीय जनता पक्षासोबत होते, परंतु तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या अश्विन पटेल यांचा १४००० मतांनी पराभव केला. वाघेला यांनी गुरुवारी सकाळी गांधीनगरमध्ये विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि तो स्वीकारण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in