नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्घन मंडळ अर्थात डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) विभागाने केलेल्या मुल्यांकनानुसार देशात नवोद्योग म्हणजे स्टार्टअप बहरण्यासाठी गुजरात आणि कर्नाटक राज्यात सर्वोत्तम वातावरण आहे. तसेच केरळ, तामिळनाडू व हिमाचल प्रदेश या राज्यातही सर्वोत्तम वातावरण आहे. स्टार्टअपसाठी सर्वोत्तम वातावरण असलेली ही राज्ये बेस्ट परफॉर्मर ठरली आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आणि मेघालय या राज्यात नवोद्योगांसाठी पोषक वातावरण आहे आणि ते डीपीआयआयटीच्या रँकिंगमध्ये टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकावला आहे.
डीपीआयआयटीने देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नवोद्योगांना पोषक वातावर देण्याबाबत पाच गटात विभागणी केली आहे. त्यात सर्वोत्तम गटाला बेस्ट परफॉर्मर, त्यापाठोपाठ अनुक्रमे टॉप परफॉर्मर, लीडर, अस्पायरिंग लीडर्स आणि एमर्जिंग लीडर्स अशी क्रमनिहाय गटवारी केली आहे. यात सर्वोत्तम गटात गुजरात, कर्नाटक, तसेच केरळ, तामिळनाडू व हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान दिले आहे. त्यापाठोपाठ टॉप परफॉर्मर या गटात महाराष्ट्र, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. तसेच आठ राज्यांना लीडर गटात समाविष्ट केले असून त्यात आंध्र प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अस्पायरिंग लीडर्स या गटात बिहार, हरयाणा, अंदमान निकोबार आणि नागालँड यांचा समावेश करण्यात आला आहे. तर छत्तीसगढ, दिल्ली, जम्मू- काश्मीर, चंडिगढ, दादरा आणि नगर हवेली, दीव व दमण, लद्दाख, मिझोराम, पुद्दुचेरी आणि सिक्कीम यांचा एमर्जिंग स्टार्टअप या गटात समावेश करण्यात आला आहे. मूल्यांकन करतांना राज्यांना विविध गुणवत्ता निकषांनुसार २५ गुणांमध्ये विभागणी केली आहे. त्यासाठी संस्थात्मक पाठिंबा, नाविन्यकरणाचे परिपोषण, बाजाराशी जवळीक, आर्थिक पाठबळ आणि रुजवात या गुणवत्ता निकषांचा आधार घेण्यात आला आहे. केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी २०२२ साली राज्य स्टार्टअप मानांकन यांनी २०२२ सालासाठी जाहीर केली आहे.