Gyanvapi Masjid Case : वाराणसी कोर्टाची ज्ञानवापी मशिदीचं सर्व्हेक्षण करण्यास पुरातत्व खात्याला मंजूरी

मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्व्हे करायला मंजूरी दिली आहे
Gyanvapi Masjid Case : वाराणसी कोर्टाची ज्ञानवापी मशिदीचं सर्व्हेक्षण करण्यास पुरातत्व खात्याला मंजूरी

ज्ञानवापी मशिदीत प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी कोर्टाने मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्व्हे करायला मंजूरी दिली आहे. हिंदू पक्षकाराचे प्रितिनिधत्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, कोर्टाने भारतीय पुरात्व खात्याला मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पुरात्व खात ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा पाहणी अहवाल न्यायाधीशांना देणार आहे. ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षकाराचा अर्ज स्वीकारण्यात आला असून न्यायालयाने वजू टाकी वगळून इतर ठिकाणी सर्वेक्षण करावं, असे निर्देश दिले आहेत.

२०२१ साली पाच महिलांनी श्रुंगार पूजेसाठी आणि अन्य धार्मिक बाबींसाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर दिवाणी कोर्टाचे न्या. रवी कुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिश्नर नियुक्त करुन ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला होता. तर हे शिवलिंग नसून फवारा असल्याचं मुस्लीम पक्षकारांकडून सांगण्यात येत होतं. यानंतर हा भाग सील करण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी केली होती. यानंतर कोर्टाने हा भाग सील करण्याचे आदेश दिल्याने, मुस्लीम पक्षकारांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in