ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

ज्ञानवापी संकुलाच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण किंवा उत्खनन केले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार
Published on

वाराणसी : येथील ज्ञानवापी संकुलाच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण किंवा उत्खनन केले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

वाराणसीच्या दिवाणी न्यायालयात ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासंदर्भात सुनावणी सुरू होती. पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणानंतर, न्यायालयाने अतिरिक्त सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ८ महिने सुनावणीनंतर शुक्रवारी निकाल देण्यात आला. दिवाणी न्यायालयाच्या निकालावर हिंदू पक्ष नाराज झाला असून त्याने उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे.

हिंदू पक्षाचे विजय शंकर रस्तोगी यांनी याचिकेत दावा केला की, मशिदीच्या मुख्य घुमटाखाली १०० फूट शिवलिंग आणि भगवान आदि विश्वेश्वराचे अर्घ आहे. तसेच बाथरूम आणि उर्वरित तळघरांच्या सर्वेक्षणाची मागणीही करण्यात आली होती. पण मुस्लीम पक्षकारांनी या मागण्यांना विरोध केला होता.

logo
marathi.freepressjournal.in