हल्द्वानी हिंसाचार : बनभूलपुरा भागात संचारबंदी शिथिल

या घटनेत बनभूलपुरा हे जमावाच्या हिंसाचाराचे केंद्र होते जेथे दगडफेक आणि जाळपोळ केली गेली होती.
हल्द्वानी हिंसाचार : बनभूलपुरा भागात संचारबंदी शिथिल
Published on

हल्द्वानी : बेकायदेशीर मदरसा पाडण्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आलेल्या सात दिवसांनंतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील बनभूलपुरा भागात विविध कालावधीसाठी संचारबंदी शिथिल केली.

या घटनेत बनभूलपुरा हे जमावाच्या हिंसाचाराचे केंद्र होते जेथे दगडफेक आणि जाळपोळ केली गेली होती. नैनिताल जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, गौजाजली, रेल्वे बाजार आणि एफसीआय गोदाम परिसरात सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल केली जाणार आहे. मात्र, उर्वरित बनभूलपुरा भागात सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदी दोन तास शिथिल होती. या काळात अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली राहतील आणि रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

तथापि, ही शिथिलता असतानाही लोकांच्या अनावश्यक हालचालींवर बंदी राहील, असे त्यात म्हटले आहे. अत्यावश्यक साधनांची पुरवठा करणारी वाहने संबंधित दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला पास असल्यास त्या परिसरात जाऊ शकतात. या हिंसाचारात सहा दंगलखोर ठार झाले होते आणि पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांसह शंभरहून अधिक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. हिंसाचारानंतर बनभूलपुरामध्ये लागू संचारबंदी पूर्वी शहराच्या बाहेरील भागातून हटवण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in