२२ जानेवारीला केंद्राची अर्धा दिवस सुट्टी

राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी होणार आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार
 २२ जानेवारीला केंद्राची अर्धा दिवस सुट्टी

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्यामुळे २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, बॅका, विमा कंपन्या अर्धा दिवस बंद राहतील, असे कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी होणार आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण भारतभर अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा साजरी केली जाणार आहे. कर्मचाऱ्‍यांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी, भारतभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सर्वांना जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. याबाबत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जनभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in