हरयाणा विधानसभा निवडणूक: काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

हरयाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसने त्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे.
हरयाणा विधानसभा निवडणूक: काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Published on

चंडीगड : हरयाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसने त्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वढेरा, भूपिंदरसिंह हुडा, कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला यांचा त्यामध्ये समावेश आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांचाही काँग्रेसच्या प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू, दीपक बाबरिया, उदय भान, अजय माकन, आनंद शर्मा, सचिन पायलट यांचाही प्रचारकांमध्ये समावेश आहे. हरयाणातील सत्तारूढ भाजप सलग विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे.

logo
marathi.freepressjournal.in