हरयाणा सरकारच्या खात्यांमध्ये ५९० कोटींचा घोटाळा; IDFC फर्स्ट बँकेकडून खुलासा

हरयाणा सरकारच्या खात्यांमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांनी आणि इतर संबंधितांनी मिळून सुमारे ५९० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खुलासा आयडीएफसी फर्स्ट बँकेने रविवारी केला.
हरयाणा सरकारच्या खात्यांमध्ये ५९० कोटींचा घोटाळा; IDFC फर्स्ट बँकेकडून खुलासा
हरयाणा सरकारच्या खात्यांमध्ये ५९० कोटींचा घोटाळा; IDFC फर्स्ट बँकेकडून खुलासा
Published on

चंदीगढ : हरयाणा सरकारच्या खात्यांमध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांनी आणि इतर संबंधितांनी मिळून सुमारे ५९० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खुलासा आयडीएफसी फर्स्ट बँकेने रविवारी केला. बँकेने शेअर बाजाराला तसेच बँकिंग नियामकांना ही बाब कळवली. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

प्राथमिक तपासानुसार, चंदीगड येथील एका विशिष्ट शाखेत हरयाणा राज्य सरकारच्या काही खात्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांनी अनधिकृत आणि फसवणूक करणारे व्यवहार केल्याचे दिसून येत आहे. यात इतर काही व्यक्ती, संस्था किंवा समोरील पक्षांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे, असे बँकेने दाखल्यात नमूद केले आहे. सध्या घोटाळ्याची रक्कम सुमारे ५९० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घोटाळ्याबाबत अधिक माहिती देताना बँकेने सांगितले की, हरयाणा सरकारचा एक विभाग आयडीएफसी फर्स्ट बँकेत व्यवहार करत होता.

एका तारखेला खाते बंद करून शिल्लक रक्कम दुसऱ्या बँकेत वर्ग करण्याची विनंती प्राप्त झाली होती. या प्रक्रियेत खात्यातील प्रत्यक्ष शिल्लक आणि नमूद केलेली रकमेत तफावत आढळली, असे बँकेने म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in