केजरीवाल यांच्याविरोधात हरयाणा सरकार गुन्हा दाखल करणार; यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप भोवणार
नवी दिल्ली : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा आरोप ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या आरोपप्रकरणी हरयाणा सरकारकडून केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
हरयाणाचे कॅबिनेट मंत्री विपुल गोयल यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी यमुनेत विष मिसळल्याच्या केलेल्या आरोपाबाबत हरयाणा सरकार केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवेल.
आपत्ती व्यवस्थापनाच्या कलम २ ड, १५४ अंतर्गत सोनीपत येथील ‘सीजेएम’ न्यायालयात गुन्हा दाखल केला जाईल. केजरीवाल यांनी हरयाणा आणि दिल्लीतील लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले आहे.
हरयाणाच्या मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी
केजरीवाल यांच्या आरोपानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या पल्ला गावात पोहोचले आणि तेथे ते यमुनेचे पाणी प्यायले. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सीएम सैनींना सोबत पल्ला घाटावर जाऊन यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आव्हान दिले होते.