Haryana violence : नूहसह आजुबाजू्च्या भागात इंटरनेट बंद, ५ जिल्ह्यांत ९३ FIR दाखल; १७६ जणांना अटक

पोलिसांकडून हिंसाचाराला कारणीभूत असल्याचं मानल्या जाणाऱ्या २३०० व्हिडिओंचा तपास करण्यात येत आहे.
Haryana violence : नूहसह आजुबाजू्च्या भागात इंटरनेट बंद, ५ जिल्ह्यांत ९३ FIR दाखल; १७६ जणांना अटक

हरियाणात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून तीव्र कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत ५ जिल्ह्यांमध्ये ९३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तसंच आतापर्यंत १७६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४६ एफआयआर फक्त नूहमध्ये दाखल करण्यात आले आहेदत. याशिवाय नूहचे पोलीस अधिकारी वरुण सिंगला यांची बदली करण्यात आली आहे. तसंच हरिणाया हिंसाचारासंबंधी २३०० व्हिडिओ पोलिसांनी ओळखले आहेत. या व्हिडिओंनी हिंसाचाराला चिथावणी देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं मत पोलिसांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांकडून ७ एफआयआर नोंदवले आहेत. शायर गुरु घंटल नावाचे अकाऊंट कोण चालवत होते, याबाबतचा खुलासा हरियाणा पोलिसांनी केलेला नाही. पोलिसांकडून हिंसाचाराला कारणीभूत असल्याचं मानल्या जाणाऱ्या २३०० व्हिडिओंचा तपास करण्यात येत आहे.

हरियाणा सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव TVSN प्रसाद यांनी जनतेला आश्वासन दिले की, बाधित भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. या भागात तुरळक घडामोडींवर कारवाई केली जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार पुरेशा सैन्यानुसार पूर्णपणे तयार आहे. राज्यभरात निमलष्करी दलाच्या २४ कंपन्या तैनात आहे. काहीही विपरीत घडू नये यासाठी राज्यात निमलष्करी दलाच्या २४ कंपन्या तैनात आहेत. नूहमधअये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. तसंच कर्फ्यू सुरु आहे. नूहसह पलवल, फरिदाबाद, सोहना, पटौडी आणि गुरुग्रामच्या मानेसरमध्ये देखील इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोहना आणि गुरुग्राममधील मुस्लीम समुदायाने घरी नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in