द्वेषमूलक वक्तव्यावर तोडगा काढायला हवा!

अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे
द्वेषमूलक वक्तव्यावर तोडगा काढायला हवा!

नवी दिल्ली : नूँह हिंसाचार प्रकरणानंतर मुस्लिमांच्या विरोधातील अभियानाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. द्वेषमूलक वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. भविष्यात द्वेषमूलक वक्तव्ये रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा बनवणे गरजेचे आहे. या समस्येचा तोडगा काढायला हवा, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे.

सुप्रीम कोर्टाने या घटना रोखायला केंद्र सरकारकडे प्रस्ताव मागितला आहे. सुप्रीम कोर्टाने रॅलींवर बंदी घालण्याचा आदेश देण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, तुमच्याकडे असलेल्या द्वेषमूलक वक्तव्यांची कागदपत्रे नोडल अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावीत. नोडल अधिकारी समितीला या प्रकारच्या तक्रारी निवारणासाठी वेळोवेळी भेटले पाहिजे.

न्या. संजीव खन्ना म्हणाले की, आम्ही पोलीस महासंचालकांना सांगू की तुम्ही एक समिती स्थापन करा. ती समिती वेगवेगळ्या भागातील द्वेषमूलक तक्रारींवर काम करेल. त्यांच्या साहित्याची तपासणी करेल. याबाबत संबंधित पोलिसांना निर्देश देण्यात यावेत.

logo
marathi.freepressjournal.in