हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी एससी-एसटी न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी एससी-एसटी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला
हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी एससी-एसटी न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी गुरुवारी एससी-एसटी न्यायालयाने निकाल सुनावला आहे. न्यायालयाने ४ आरोपींपैकी एक आरोपी संदीप ठाकूरला दोषी ग्राह्य धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, इतर ३ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, संदीपवर सदोष मनुष्यवध आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर हा निकाल आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ४ आरोपींवर लावलेला गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर झालेला नाही. आता याप्रकरणी पीडितेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली.

हाथरसच्या एका गावामध्ये १४ सप्टेंबर २०२०ला एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बाब उघड झाली होती. यामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्याच गावातील ४ तरुणांवर हा आरोप करण्यात आला होता. पीडित मुलीच्या भावाने संदीप ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडितेच्या जबाबाच्या आधारावर २६ सप्टेंबरला लवकुश सिंह, रामू सिंह व रवी सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्याच रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही बातमी समोर येताच देशभर निदर्शने झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in