चेहऱ्यावर महागड्या क्रीम लावूनही पिंपल्स येत आहे? त्यापेक्षा पिंपल्स येऊ नयेत म्हणून 'हे' पदार्थ खाणे टाळा

आहारातील घटक हे पिंपल्स येण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. परंतु काही पदार्थ आहारातून वगळल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
चेहऱ्यावर महागड्या क्रीम लावूनही पिंपल्स येत आहे? त्यापेक्षा पिंपल्स येऊ नयेत म्हणून 'हे' पदार्थ खाणे टाळा
Published on

आपल्या चेहऱ्याची त्वचा नितळ आणि मुलायम असावी असे प्रत्येक मुलीला वाटते. मात्र बऱ्याच मुलींना विविध कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. यामध्ये त्वचेत 'असणारा तेलकटपणा, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोट साफ नसणे आणि प्रदूषण यांसारखी अनेक कारणे असतात. परंतु आहारात काही सोपे बदल केल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. आहारातील घटक हे पिंपल्स येण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. परंतु काही पदार्थ आहारातून वगळल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात काय आहेत हे पदार्थ....

  • दुध- दुधातील विशिष्ट घटक हे शरीराच्या काही तक्रारींसाठी कारणीभूत असतात. दुधामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होते. त्यामुळे पिंपल्स तयार होतात.

  • चॉकलेट- चॉकलेट हा अनेकांचा वीकपॉइंट असतो. परंतु एका संशोधनानुसार चॉकलेट खाल्ल्याने पिंपल्स येतात. चॉकलेटमध्ये असलेली शुगर पिंपल्ससाठी कारणीभूत ठरते त्यामुळे जर या समस्येपासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर चॉकलेट खाणे कमी करायला हवे.

  • सोडा- सोडा हा ठराविक प्रमाणात खाल्ल्यास ठीक आहे. मात्र तो जास्त खाल्ल्यास आरोग्यासाठी धोकादायक असतो. सोड्यात मोठ्या प्रमाणात फ्रुक्टोज असते यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते त्वचेसाठी हानिकारक असते. यामुळे पिंपल्स नव्याने येतात आणि आलेले वाढतातही.

  • वेफर्स- अनेकदा आपण ऑफिसमध्ये किंवा अगदी सहज म्हणूनही वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स खातो. भूक लागल्यावरही अनेक जण अगदी सहज बटाट्याचे वेफर्स खातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल, काबोर्हायड्रेट आणि इतर घटक असतात. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात म्हणून वेफर्स खायची सवयही सोडा.

logo
marathi.freepressjournal.in