एचडीएफसी बँक समूहाला सहा बँकांमधील हिस्सा खरेदीस मंजुरी

एचडीएफसी बँक या कालावधीत भागभांडवल खरेदी करू शकली नाही तर, मंजुरी रद्द केली जाईल.
एचडीएफसी बँक समूहाला सहा बँकांमधील हिस्सा खरेदीस मंजुरी
Published on

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँक समूहाला इंडसइंड बँक, येस बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि बंधन बँकेतील ९.५० टक्क्यांपर्यंत शेअर्स खरेदीची मंजुरी दिली आहे. एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, हिस्सा विकत घेण्याची ही मंजुरी एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी), एचडीएफसी अर्गो आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांच्या गुंतवणुकीसाठी आहे. ही मान्यता एका वर्षासाठी - ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वैध आहे. एचडीएफसी बँक या कालावधीत भागभांडवल खरेदी करू शकली नाही तर, मंजुरी रद्द केली जाईल.

आरबीआयची ही मान्यता बँकिंग नियमन कायदा, १९४९, आरबीआय मास्टर डायरेक्शन आणि १६ जानेवारी २०२३ रोजी बँकिंग कंपन्यांमधील शेअर्स किंवा मतदानाचे हक्क संपादन आणि धारण करण्याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संबंधित तरतुदींचे पालन करण्याच्या अधीन आहे.

एचडीएफसी बँकेला हे निश्चित करावे लागेल की, इंडसइंडमधील एकूण होल्डिंग कधीही इंडसइंडच्या पेड-अप शेअर कॅपिटल किंवा मतदान अधिकाराच्या ९.५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. त्याच वेळी एकूण होल्डिंग ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इंडसइंड बँक आणि येस बँकेचे पेड अप शेअर भांडवल किंवा मतदानाचे अधिकार ५ टक्के किंवा त्याहून अधिक वाढवण्यासाठी आरबीआयची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.

logo
marathi.freepressjournal.in