एचडीएफसी बँकेने कर्ज महाग केले

एचडीएफसी बँकेने कर्ज महाग केले
Published on

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू आहे. त्याचे निष्कर्ष बाहेर येण्यापूर्वीच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्ज महाग केले आहे. बँकेने कर्जावरील व्याजदर ०.३५ टक्के वाढवले आहेत. बँकेने दोन महिन्यात दुसऱ्यांदा व्याजदर वाढवले आहेत. बँकेने दोन वेळा व्याजदर वाढवून कर्जावरील व्याजदरात ०.६० टक्के वाढ केली. नवीन व्याजदर ७ जून लागू झाले आहेत.

बँकेने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एमसीएलआरला ०.३५ टक्के वाढवले. बँकेचा एक वर्षांचा एमसीएलआर ७.५० वरून ७.८५ टक्के झाला. तर तीन वर्षांचा एमसीएलआर ७.७० वरून ८.०५ टक्के झाला आहे. त्यामुळे एमसीएलआरवर आधारित नवीन कर्जावरील व्याजदर महाग होणार आहेत. तसेच ज्यांचे पूर्वीचे कर्ज सुरू आहे. त्यांचा मासिक ईएमआय वाढणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण समितीची बैठक सुरू आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा आरबीआय व्याजदरात वाढ करू शकते. सध्या रेपो दर ४.४० टक्के आहे.

logo
marathi.freepressjournal.in