ज्ञानवापी मशिद आव्हान याचिकेवरील सुनावणी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे

ज्ञानवापी मशिद आव्हान याचिकेवरील सुनावणी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू प्रार्थनांना परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली.

प्रयागराज : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू प्रार्थनांना परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या वाराणसीतील मशिदीचे कामकाज पाहणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने गेल्या आठवड्यात ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात नमाज अदा करण्यास परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी दाखल केली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ज्ञानवापी मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणताही तत्काळ दिलासा दिला नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करत १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in