स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर ; पुढची तारीख २८ मार्च

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर ; पुढची तारीख २८ मार्च

४ महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी प्रलंबित असून निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी २८ मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून यावरील सुनावणीची तारीख पुढे पुढे जात आहे. या निकालावर निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्षभराहून रखडलेल्या आहेत. आधी कोरोनाचे सावंत त्यानंतर ओबीसी आरक्षण यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण, न्यायालयाच्या निकालाआधी जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांमध्येदेखील आरक्षण लागू व्हावे, यासाठी राज्य सरकारने न्यायालयात धाव घेतली. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वॉर्ड रचना शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने बदलली. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण, न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यावर सुनावणीच होऊ शकली नाही. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा असताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती देण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in