
जयपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतरही राजस्थानात सूर्य आग ओकत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे.
उष्णतेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर शहराचे तापमान बुधवारी ४८ अंशांवर पोहचले होते. विशेष म्हणजे बाडमेर व जैसलमेरपेक्षा जास्त तापमान जयपूरमध्ये आहे. जैसलमेरमध्ये ४३.७ अंश, बाडमेर ४४.२ अंश, तर जयपूरमध्ये ४४.४ अंश तापमान नोंदले गेले.
जम्मूत ४४.४ अंश तापमान
जम्मूत ४४.४, सांबा ४६.८ अंश, उधमपूर ४२.४ अंश, रामबन ४१.९ अंश व राजौरीत ४०.२ अंश तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ५ ते ७ अंशांनी वाढले गेले.