पंजाब हरियाणात पावसाचे थैमान ; ५५ लोकांचा मृत्यू तर हजारो लोकांचं स्थलांतर

ज्या ठिकाणी बोटी जाणार नाहीत तेथील नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यास सांगण्यात आले आहेत
पंजाब हरियाणात पावसाचे थैमान ; ५५ लोकांचा मृत्यू तर हजारो लोकांचं स्थलांतर

उत्तर भारतात सध्या पावसाने थैमान घातलं असून यामुळे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्याच्या अनेक भागातून पावसाचं पाणी ओसरु लागलं आहे. या दोन्ही राज्यात्या बाधित भागात मदतकार्य सुरु आहे. पंजाब राज्यातील १३ तर हरियाणा राज्यातील १४ राज्य या पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. या दोन्ही राज्यात आलेल्या या आपत्तीमुळे आतापर्यंत एकुण ५५ जणांचा बळी गेला आहे. यासंदर्भात आलेल्या सरकारी आकडेवारीवरुन पंजाबमध्ये आतापर्यंत २९ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर हरियाणामघ्ये २६ लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. पंजाबमध्ये पूरपरिस्थितीत बाधित जिल्ह्यातील २५,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर हरियाणामध्ये ही संख्या ५,३०० एवढी आहे.

या पार्श्वभूमीवर जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुनचा देण्यात आल्या आहेत. तसंच पूरग्रस्त भागात वैद्यकीय शिबिरे सुरु करण्यात आली असून नागरिकांना औषधांचं वाटप करण्यात आलं आहे. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात शनिवार रोजी घग्गर नदीत दोन बंधारे फुटल्याने हरियाणाच्या सिमेवरील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बोटीच्या सहाय्याने बाधित लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर ज्या ठिकाणी बोटी जाणार नाहीत तेथील नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यास सांगण्यात आले आहेत. तसंच पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना कोरडेरेशन, अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधं पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

लष्कर, सीमा सुरक्षा दल, आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या समन्वयाने मदत आणि बचाव कार्य केलं. तसंच फरीदाबाद पोलिस आणि एनडीआरएफ टीमच्या संयुक्त मदतकार्यांतर्गत शनिवारी सकाळी फरिदाबादच्या पूरग्रस्त भागातून ५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in