हेमंत सोरेन यांच्या मालकीचा ३१ कोटींचा भूखंड जप्त

ईडीने सोरेन यांच्यासह त्यांचे सहकारी भानू प्रताप प्रसाद, राजकुमार पहान, हिलारियास कच्चप आणि विनोद सिंह यांच्याविरुद्ध ३० मार्च रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
हेमंत सोरेन यांच्या मालकीचा ३१ कोटींचा भूखंड जप्त

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा रांची येथील ८.८६ एकरचा ३१ कोटी रुपये किमतीचा भूखंड सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केला. सोरेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी चौकशी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे, असे यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईडीने सोरेन यांच्यासह त्यांचे सहकारी भानू प्रताप प्रसाद, राजकुमार पहान, हिलारियास कच्चप आणि विनोद सिंह यांच्याविरुद्ध ३० मार्च रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सरकारी पक्षाच्या तक्रारीची न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. ८.८६ एकरचा भूखंड ताब्यात घेण्याबाबत ईडीने विनंती केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in