रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी गुरुवारी राज्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज भवनात सोरेन यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
‘जेएमएम’चे सर्वेसर्वा शिबू सोरेन, हेमंत सोरेन यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील आघाडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन या शपथविधीला हजर होते. भूखंड घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची २८ जून रोजी कारागृहातून सुटका करण्यात आली.