गड्या अपुला परदेश बरा; ४३०० कोट्यधीश भारत सोडणार

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्या भारतात येत असतानाच भारतीय उद्योगपती देशातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत.
गड्या अपुला परदेश बरा; ४३०० कोट्यधीश भारत सोडणार

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्या भारतात येत असतानाच भारतीय उद्योगपती देशातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. यंदा ४३०० कोट्यधीश भारत सोडू शकतात, असा अहवाल हेन्ले ॲॅण्ड पार्टनर्सने दिला आहे. विशेष म्हणजे या कोट्यधीशांना आता संयुक्त अरब अमिराती हा देश आवडू लागला आहे. हे कोट्यधीश तेथे स्थायिक होणार आहे.

हेन्ले ॲॅण्ड पार्टनर्सने सांगितले की, गेल्यावर्षी ५१०० कोटयधीशांनी भारताला राम राम केला. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला भारत हा कोटयधीश पलायनांच्या बाबतीत चीन, ब्रिटननंतर तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. चीनचा कोटयधीशांच्या परदेशी पलायनाचा दर ३० टक्के आहे. त्या तुलनेत भारतातील कोटयाधीशांच्या पलायनाचा दर कमीच आहे.

भारत दरवर्षी हजारो कोट्यधीशांना मुकत आहे. त्यातील बहुतांशी संयुक्त अरब अमिरातीत राहत आहेत. विशेष म्हणजे, जितके लोक परदेशात पलायन करत आहेत, तितकेच कोटयवशी रुपये कमावणारे लोक भारतात तयार होत आहेत. म्हणजेच नवीन कोटयधीश बनत आहेत.

भारतात दुसरे घर ठेवतातच

भारतीय कोटयधीश परदेशात स्थायिक होत असले तरीही दुसरे घर म्हणून भारताला ते सोडत नाहीत. तसेच ते आपला भारतातील व्यवसाय सोडत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.

२०२४ मध्ये जगातील १ लाख २८ हजार कोट्यधीश व्यक्तींनी देशातून पलायन केले. सर्व कोटयधीशांचा आवडता देश संयुक्त अरब अमिरात व अमेरिका हा आहे.

हे प्रवासी कोटयधीश आपल्यासोबत संपत्ती घेऊन परकीय चलन साठ्यात मोठे योगदान देतात. तसेच त्यांच्या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेअर बाजाराला प्रोत्साहन मिळते.

logo
marathi.freepressjournal.in