तीन कोटींचे हेरॉर्इन जप्त, दोघांना अटक

४५ साबणाच्या डब्यांमध्ये ५६६ ग्रॅम हिरॉर्इन सापडले
तीन कोटींचे हेरॉर्इन जप्त, दोघांना अटक

दिफू (आसाम): आसाममधील कार्बी अंगलॉंग जिल्ह्यात मंगळवारी सुमारे तीन कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्यासंबधी दोन व्यक्तींना अटकही करण्यात आली आहे. पोलिसांना याबाबत खबर मिळाल्यानंतर जनकपुखुरी क्षेत्रात पोलिसांनी शोध सुरू केला. असे करताना त्यांनी शेजारच्या नागालँड राज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली. या तपासात ४५ साबणाच्या डब्यांमध्ये ५६६ ग्रॅम हिरॉर्इन सापडले. तेव्हा पोलिसांनी दोन इसमांना अटक केली. दोन्ही व्यक्ती मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील आहेत. जप्त करण्यात आलेल्या हेरॉर्इनची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे तीन कोटी रुपये किंमत आहे.

logo
marathi.freepressjournal.in