थिएटरमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये 'हिडन कॅमेरा' आढळल्याने गोंधळ; एकजण पोलिसांच्या ताब्यात, Video व्हायरल

महिलांच्या स्वच्छतागृहात लवपलेला कॅमेरा आढळल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी कॅमेरा लपवल्याच्या संशयावरून एका किशोरवयीन मुलाला मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सोशल मीडियावर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
थिएटरमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये 'हिडन कॅमेरा' आढळल्याने गोंधळ; एकजण पोलिसांच्या ताब्यात, Video व्हायरल
थिएटरमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये 'हिडन कॅमेरा' आढळल्याने गोंधळ; एकजण पोलिसांच्या ताब्यात, Video व्हायरलPhoto Via Instagram
Published on

कर्नाटकातील बंगळुरू शहरातील एका सिनेमागृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील 'संध्या थिएटर'मध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात लवपलेला कॅमेरा आढळल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी कॅमेरा लपवल्याच्या संशयावरून एका किशोरवयीन मुलाला मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सोशल मीडियावर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

संतप्त नागरिकांनी दिला चोप

प्राथमिक माहितीनुसार, तेलुगू चित्रपट ('नुव्वू नाकू नचव' Nuvvu Naaku Nachav) च्या पुनर्प्रदर्शनादरम्यान, चित्रपट पाहणाऱ्या महिला प्रेक्षक शौचालयात गेल्या असता हा लपवलेला कॅमेरा आढळून आला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी कॅमेरा लपवण्याच्या संशयावरून तात्काळ एका किशोरवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी त्या तरुणाला मारहाण केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. कॅमेरा कोणत्या उद्देशाने बसवण्यात आला होता, कोणतेही चित्रीकरण झाले आहे का आणि ते पुढे कुठे प्रसारित करण्यात आले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तपकिरी रंगाचा शर्ट घातलेली एक महिला किशोरवयीन मुलासमोर उभी राहून त्याच्याकडे बोट दाखवत जाब विचारताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारीही उपस्थित असल्याचे दिसून येते. त्या व्यतिरिक्त, थिएटरमध्ये उपस्थित असलेले इतर नागरिक, विशेषतः पुरुष प्रेक्षकही या प्रकारामुळे संतप्त झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ Namma Bengaluru (@nammabengaluroo) या इन्स्टाग्राम अकाउंटवर सोमवारी सकाळी शेअर करण्यात आला.

कॅमेऱ्याच्या फॉरेन्सिक तपासासह चौकशीतील निष्कर्षांवर पुढील कायदेशीर कारवाई अवलंबून असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरही व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in