पाश्चिमात्य देशांकडून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन ;पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाश्चिमात्य देशांकडून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन  ;पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on

भारत हा कायमच पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे. पाश्चिमात्य देशांकडून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माती वाचवा’ अभियानात ते बोलत होते. ते म्हणाले की, “स्वच्छ भारत मिशन, कचऱ्यापासून संपत्ती, सिंगल यूज प्लास्टिक बंदी, गंगा स्वच्छता अभियान आदी सर्व प्रकल्प पर्यावरण संरक्षणासाठी भारताने राबवले आहेत. गेल्या आठ वर्षांत भारतात ज्या योजना सुरू आहेत, त्यात पर्यावरण संरक्षणाचा आग्रह धरला आहे. जगातील विकसित देश हे पृथ्वीवरील संसाधनांचा जास्त वापर करत आहेत. जास्त कार्बन उत्सर्जन हेच देश करत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने सीडीआरआय व आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीच्या निर्माणाचे नेतृत्व केले. २०७०पर्यंत भारताने ‘नेट झीरो’चे लक्ष्य ठेवले आहे.देशातील माती जिवंत ठेवण्यासाठी भारताने सदैव काम केले आहे. माती वाचवायला त्यातील रासायनिक घटक कसे कमी होतील, याकडे लक्ष दिले आहे. मातीत पाण्याचे योग्य प्रमाण राहील, याकडे लक्ष दिले आहे,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in