काँग्रेसला ‘देशासाठी देणगी’ मोहिमेत महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद

पक्षाने निधी संकलनाबाबत कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एनएसयूआयच्या माध्यमातूनही निधी उभारावा, अशी सूचना राहुल यांनी केली
काँग्रेसला ‘देशासाठी देणगी’ मोहिमेत महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद
PM

नवी दिल्ली : "देशासाठी देणगी द्या" या आवाहनामध्ये काँग्रेससाठी क्राऊडफंडिंग अंतर्गत निधी उभारण्यात महाराष्ट्र अव्वल आहे, त्यानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नवनियुक्त कोषाध्यक्ष अजय माकन यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना निधी गोळा करताना ही माहिती दिली.

ते म्हणाले की, पक्षाने निधी संकलनाबाबत कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एनएसयूआयच्या माध्यमातूनही निधी उभारावा, अशी सूचना राहुल यांनी केली. काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत असल्याने १३८ रुपये, १३८० रुपये, १३,८०० रुपये आणि अशाच प्रकारे कलेक्शन झाल्याचे माकन म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in