..तर महामार्ग यंत्रणांनी टोल आकारणी करू नये! नितीन गडकरी यांची सूचना

रस्त्यांची अवस्था चांगली नसेल तर महामार्ग यंत्रणांनी टोलची आकारणी करू नये, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
..तर महामार्ग यंत्रणांनी टोल आकारणी करू नये! नितीन गडकरी यांची सूचना
Published on

नवी दिल्ली : रस्त्यांची अवस्था चांगली नसेल तर महामार्ग यंत्रणांनी टोलची आकारणी करू नये, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. उपग्रह- आधारित टोल यंत्रणेबाबतच्या जागतिक कार्यशाळेत ते बोलत होते. ही यंत्रणा या वर्षी पाच हजार कि.मी.पेक्षा अधिक मार्गावर बसविण्याची योजना आहे.

जर तुम्ही चांगल्या दर्जाची सेवा देत नाहीत, तर तुम्ही टोलची आकारणी करू शकत नाही, वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्यासाठी आपण टोलची घाई करतो आणि आपल्या हिताचे रक्षण करतो, जेव्हा तुम्ही चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देता, तेव्हाच वापरकर्त्याकडून शुल्क आकारू शकता. खड्डे, चिखलाने भरलेले रस्ते असूनही तुम्ही टोल आकारला तर जनतेकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे, असेही गडकरी म्हणाले.

‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम’वर (जीएनएसएस) आधारित इलेक्ट्रॉनिक टोल आकारणी यंत्रणा सुरू करण्याची ‘एनएचएआय’ची योजना आहे. ही योजना प्रथम व्यापारी वाहनांसाठी आणि त्यानंतर खासगी वाहनांसाठी सुरू करण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in