केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता वाढला; ६८ लाख निवृत्तीधारकांनाही होणार फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता वाढला; ६८ लाख निवृत्तीधारकांनाही होणार फायदा
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे.

आता हा भत्ता ४६ वरून ५० टक्के झाला आहे. याचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६८ लाख निवृत्तीधारकांना होणार आहे. डीए वाढल्याने घरभाडे भत्ताही वाढणार आहे. तसेच केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेच्या कालावधीतही एक वर्षाने वाढ केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in