हिमाचलमध्ये बसवर कोसळली दरड; १८ जण ठार

हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भूस्खलन झाले. या दुर्घटनेत बसवर दरड पडल्याने झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी ठार झाले. हा अपघात झंडुट्टा विधानसभा भागातील भालूघाट परिसरात घडला.
हिमाचलमध्ये बसवर कोसळली दरड; १८ जण ठार
Photo : X (@SukhuSukhvinder)
Published on

सिमला : हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भूस्खलन झाले. या दुर्घटनेत बसवर दरड पडल्याने झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी ठार झाले. हा अपघात झंडुट्टा विधानसभा भागातील भालूघाट परिसरात घडला.

३०-३५ प्रवासी घेऊन जाणारी ही बस हरयाणाच्या रोहतकहून घुमारवींकडे जात होती. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दुर्घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यांतून १८ मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. संपूर्ण डोंगर बसवर कोसळल्याने प्रवाशांची जीवित राहण्याची शक्यता कमी आहे, असे बचावकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून, बचावकार्य त्वरेने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in