
चेन्नई : हिंदी हा मुखवटा असून संस्कृत हा खरा चेहरा आहे. हिंदीची जबरदस्ती केल्याने १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा संपल्या आहेत, अशी टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केली.
स्टालिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून सांगितले की, हिंदीमुळे प्राचीन भाषा संपत आहेत. उत्तर प्रदेश व बिहार हे कधीही हिंदी क्षेत्र नव्हते. त्यांच्या स्वत:च्या भाषा विस्मरणात गेल्या आहेत. हिंदीने भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढ़वाली, कुमाऊंनी, मगही, मारवाड़ी, मालवी, छत्तीसगढ़ी, संथाली, अंगिका, हो, खरिया, खोरठा, कुरमाली, कुरुख, मुंडारी आदी भाषा संपवल्या आहेत. तमिळ जनतेवर हिंदी व संस्कृतची आर्य संस्कृती थोपवू नये, असा त्याचा उद्देश होता.