हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्के घटली; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची आकडेवारी

देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असतानाच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील आणि जगातील बहुसंख्याक व अल्पसंख्याक लोकसंख्येचा
हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्के घटली; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची आकडेवारी

नवी दिल्ली : देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असतानाच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील आणि जगातील बहुसंख्याक व अल्पसंख्याक लोकसंख्येचा अभ्यास केला आहे. भारतात बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्के घटली, तर मुस्लिमांची लोकसंख्या ४३.१५ टक्क्याने वाढली आहे. १९५० ते २०१५ या काळात हिंदूंची लोकसंख्या ८४.६८ टक्के होती. २०१५ नंतर ती ७८.०६ टक्के झाली. तर मुस्लिमांची लोकसंख्या १९५० ते २०१५ दरम्यान ९.८४ टक्के होती. ती २०१५ पर्यंत १४.०९ टक्के झाली. मुस्लिमांच्या लोकसंख्येत ४३.१५ टक्के वाढ झाली.

ख्रिश्चनांची लोकसंख्या ५.३८ टक्के तर शीखांची लोकसंख्या ६.५८ टक्के वाढली. देशाची लोकसंख्या १.२४ टक्के होती ती २०१५ मध्ये १.८५ टक्के झाली. तर बौद्धांची लोकसंख्या ०.०५ टक्क्यांवरून ०.८१ टक्के झाली.

या अभ्यासात पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य शमिका रवि, सल्लागार अपूर्व कुमार मिश्र, अब्राहम जोस हे सहभागी झाले होते.

या धर्मांची लोकसंख्या झाली कमी

जैन धर्मीयांची लोकसंख्या १९५० मध्ये ०.४५ टक्के होती. २०१५ मध्ये ती ०.३५ टक्के झाली. तर पारशी धर्मीयांची संख्या ८५ टक्के घटली आहे. १९५० मध्ये पारशांची लोकसंख्या ०.०३ टक्के होती. २०१५ मध्ये ती ०.००४ टक्के राहिली.

जनगणनेतून लोकसंख्येची आकडेवारी मिळते

भारतात जनगणना केल्यानंतर लोकसंख्येची आकडेवारी मिळते. १९३१ मध्ये ब्रिटिशांच्या काळात जनगणना झाली होती. त्यानंतर स्वतंत्र भारताची जनगणना १९५१ मध्ये झाली. शेवटची जनगणना १९११ मध्ये झाली. त्यानंतर २०२१ मध्ये होणार होती. मात्र, कोरोना काळामुळे ती स्थगित झाली. बहुसंख्याक व अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी १६७ देशांचा अभ्यास करण्यात आला.

पाकिस्तान, बांगलादेशातील मुस्लिमांचे प्रमाण किती?

बांगलादेशात मुस्लिमांच्या लोकसंख्येत १८ टक्के वाढ झाली. तर पाकिस्तानात हनफी मुस्लिमांची लोकसंख्या ३.७५ टक्क्याने वाढली. तर मुस्लिमांची लोकसंख्या १० टक्क्याने वाढली. तर गैरमुस्लीम बहुसंख्याक लोकसंख्या असलेल्या भारत, म्यानमार, नेपाळमध्ये बहुसंख्याक असलेल्या धर्मीयांची लोकसंख्या घटली. नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ४ टक्के तर बौद्धांची लोकसंख्या तीन टक्क्यांनी घटली. तर मुस्लिमांची लोकसंख्या दोन टक्के वाढली.

logo
marathi.freepressjournal.in