पोलीस गस्ती वाहनाला धडक; दोन ठार, तीन जखमी

हावडा शहराकडे जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या गस्ती व्हॅनच्या मागील बाजूस धडकले
पोलीस गस्ती वाहनाला धडक; दोन ठार, तीन जखमी

हावडा : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात गुरुवारी एका वेगवान वाहनाने पोलिसांच्या उभ्या गस्ती व्हॅनला जोरदार धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह दोन पोलिस ठार झाले आणि तीन जण जखमी झाले.

ही घटना गुरुवारी पहाटे बागनान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरुंदा परिसरात राष्ट्रीय महामार्ग १६ वर घडली. हावडा शहराकडे जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या गस्ती व्हॅनच्या मागील बाजूस धडकले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोलिंग व्हॅनमधील लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपनिरीक्षक सुजॉय दास (४५) आणि होमगार्ड पलाश सामंता (३१) यांना मृत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चालक अबू बकर (२८) आणि होमगार्ड सुखदेब बिस्वास (२५) आणि आलोक बार (२६) अशी उर्वरित तीन पोलिसांना चांगल्या उपचारांसाठी कोलकाता येथील एस.एस.के.एम. रुग्णालयात हलवण्यात आले आणि ते सध्या निरीक्षणाखाली आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. एडीजी आणि आयजीपी (दक्षिण बंगाल) सिद्धी नाथ गुप्ता, हावडा (ग्रामीण) एस.पी. स्वाती भंगालिया यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी सांगितले की, गस्ती वाहनाला धडक देणारे वाहन पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in