चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’

गर्दी नियंत्रणात ठेवून चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’ तयार करण्याची योजना आखण्यात येणार आहे.
चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’
चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’X - @hajipurrajesh
Published on

नवी दिल्ली : गर्दी नियंत्रणात ठेवून चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’ तयार करण्याची योजना आखण्यात येणार आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याबाबत आता दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे. मात्र, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.

गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभ मेळ्यादरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एआय’चीही मदत

चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वेने देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘होल्डिंग झोन’ तयार करण्याची योजना आखली आहे. तसेच संकट व्यवस्थापनासाठी ‘एआय’चीही मदत घेतली जाणार आहे. ‘एआय’सह तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. विशेषतः ट्रेनच्या विलंबाच्या वेळी ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in