Holi : १ लाखाची चांदीची पिचकारी पाहिली का? उत्तर प्रदेशमध्ये आहे 'हा' खास ट्रेंड

उत्तर प्रदेशातील परंपरा आणि एक लाखाच्या चांदीच्या अतिशय छोट्या पिचकारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे अशा चांदीच्या पिचकाऱ्या ८ हजारापासून १ लाखापर्यंत विकल्या जात असून किमान एक हजार लोकांनी विकत घेतल्या आहेत. जाणून घ्या काय वैशिष्ट्य आहे या चांदीच्या पिचकारीचे आणि काय आहे उत्तर प्रदेशमधील खास परंपरा.
Holi : १ लाखाची चांदीची पिचकारी पाहिली का? उत्तर प्रदेशमध्ये आहे 'हा' खास ट्रेंड
ANI
Published on

सर्वांचे मन प्रफुल्लित करणारा रंगांचा सण होळी संपूर्ण देशभरात आजपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. होलिका दहनाचे साहित्य, अनुष्ठानाची सामग्री यांसह विविध रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजार फुलले आहे. होळीनिमित्त आकर्षक पिचकाऱ्या बाजारात आल्या आहेत. या पिचकाऱ्या विविध आकारात आणि विविध रंगात असतात. दरवर्षी या पिचकाऱ्यांमध्ये काही ना काही नवीन डिझाईन पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशातील परंपरा आणि एक लाखाच्या चांदीच्या अतिशय छोट्या पिचकारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे अशा चांदीच्या पिचकाऱ्या ८ हजारापासून १ लाखापर्यंत विकल्या जात असून किमान एक हजार लोकांनी विकत घेतल्या आहेत. जाणून घ्या काय वैशिष्ट्य आहे या चांदीच्या पिचकारीचे आणि काय आहे उत्तर प्रदेशमधील खास परंपरा.

पिचकारीने एकमेकांवर पाणी किंवा रंग मारणे ही होळीची परंपरा आहे. या पिचकारीने ''बलम पिचकारी'', ''मारेंगे हम पिचकारी'', अशा प्रकारे बॉलिवूड गाण्यांमध्येही आपले स्थान मिळवले आहे. मात्र, नुकतीच उत्तर प्रदेशातील एक दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर नक्षीकाम असलेल्या चांदीची पिचकारी आणि जोडीला छोटी पाण्याची बादली असलेला एक व्हिडिओ वृत्तसंस्था 'एएनआय'ने एक्स खात्यावर पोस्ट केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. तसं तर एकमेकांवर रंग मारण्यासाठी आकाराने पिचकाऱ्या थोड्या मोठ्या असायला हव्या. तर रंग मारायला मजा येते. मात्र, चांदीच्या असल्यामुळे या पिचकाऱ्या आकाराने खूप छोट्या आहेत. तरी तिच्या आकर्षक नक्षीकामामुळे त्या खूप खास दिसत आहे.

एक लाखांच्या चांदीच्या पिचकारीचे सुंदर नक्षीकाम

पांढऱ्या शुभ्र चांदीवर गुलाबी, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या पानाफुलांचे नक्षीकाम केले आहे. ज्यामध्ये आकर्षक मिनाकारी काम केले गेले आहे. जे डोळ्यांना पाहण्यासाठी सुखद वाटते. जोडीला छोटी चांदीची बादली त्यावरही अशाच प्रकारच्या मिनाकारीने सजवलेल्या पानाफुलांचे नाजूक नक्षीकाम केले आहे. हे गुंतागुंतीचे कोरीव काम लक्ष वेधून घेत आहे.

काय आहे उत्तर प्रदेशमधील चांदीच्या पिचकारीची खास परंपरा

आदेश कुमार जैन, उपाध्यक्ष, लखनौ सराफा असोसिएशन, यांनी या पिचकाऱ्या का बनवल्या जातात, काय आहे याचे महत्त्व आणि काय आहे परंपरा याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लग्नानंतरच्या पहिल्या होळीसाठी नववधूला तिचे माहेरचे नातलग अशा प्रकारच्या चांदीच्या छोट्या पिचकारी समृद्धीचे प्रतिक म्हणून उपहारात देतात. त्यासाठी विशेष ऑर्डर देऊन अशा प्रकारच्या पिचकाऱ्या बनवून घेतल्या जातात. त्यांची किंमत साधारण आठ हजार रुपयांपासून सुरू होते. जो तो आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार अशा चांदीच्या पिचकाऱ्या आणि छोटी बादली तयार करून घेतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली बहुतेक नवीन जोडपी अशा पिचकारीने होळी खेळण्याची प्रथा पाळतात. यंदा एक लाखांची चांदीची पिचकारी आणि बादली बनवली गेली आहे. ज्याचे नक्षीकाम खूपच विशेष आहे. 'यंदा किमान एक हजार चांदीच्या पिचकाऱ्या आणि बादली विकल्या गेल्या आहेत,'' असेही जैन म्हणाले. तर, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या होळीला चांदीच्या पिचकारीने खेळण्याची नवविवाहितांमध्ये क्रेझ असते. लग्न ठरलेले तरुण देखील होणाऱ्या पत्नीसाठी चांदीची पिचकारी, मिठाई, रंग आणि गुलाल होळीच्या दिवशी भेट म्हणून पाठवतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रेंड सुरू आहे, असेही येथील चौक सराफा संघटनेच्या विनोद माहेश्वरी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in