उत्तर प्रदेशात २२ जानेवारीला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

देशभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्साह असल्याने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे.
उत्तर प्रदेशात २२ जानेवारीला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

लखनऊ : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत १७ लाख भाविकांचा मेळा जमणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सरकारने सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली असून आर्मीसह एनएसजी कमांडो आणि स्नायपरही तैनात असणार आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर देशभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्साह असल्याने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आता यूपीतील योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. तसेच, या दिवशी मद्यविक्रीलाही बंदी घालण्यात आली असून वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांना दिले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत मोठा उत्सव असून देशभरात हा सोहळा साजरा होणार आहे. त्यामुळे, इतरही राज्यांतील सरकारकडे या सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातही भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in