समलैंगिकांमध्ये विवाह होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी मांडलं मत

समलैंगिकांमध्ये विवाह होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी मांडलं मत

समलैंगिक विवाहबद्दल अनेक युक्तीवाद सुरु आहेत. अनेकजण यांच्या समर्थनार्थ आहेत. तर अनेकांनी याला कडवा विरोध दर्शवला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहानांना मान्यता देण्याबाबतच्या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस कुरियन जोसेफ यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. माजी न्यायमूर्ती जोसेफ यांनी आपण समलैंगिक विवाहाच्या 100 टक्के विरोधात असल्याचं सांगितलं आहे. समलैंगित संबंधांना जास्तीत जास्त युनियन किंवा असोसिएशन म्हटलं जाऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी विवाहाचा उद्दशे वेगळा असल्याचं सांगितलं. स्त्री आणि पुरुषाचं मिलन हे विवाहाच मुळ आहे. संमलैंगिक संबंध हे युनियन किंवा असोसिएशन प्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लग्नानंतर स्त्री पुरुष एकत्र येऊन मुलांना जन्म देतात. मी समलैंगिक विवाहाला मान्याता देण्याच्या 100 टक्के विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे विवाह नैतिकतेला धरून नाहीत. एकत्र राहणं, घनिष्ठ मैत्री असणं, समलिंगी संबंध ठेवणं, हे वेगळ असू शकतं. मात्र, विवाह ही एक वेगळी संकल्पना असल्याने त्यांच्यात विवाह होऊ शकत नाही, असं कुरीयन यांनी म्हटलं आहे.

जोसेफ कुरीयन यांनी समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याला कडवा विरोध दर्शवला आहे. समलैंगिक विवाह असा मुद्दा आहे जो संस्कृती, धर्माशी घट्टपणे जोडला गेला आहे. नैतिक स्तरावर या मुद्यावर वाद विवाद झाले पाहिजेत, एका वेगळा दृष्टीकोण याकडे बघण्याचा असला पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असल्याने त्यावर मी जास्त बोलू इच्छित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. live law ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in