ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेल्या धडकेत २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, ६५० प्रवासी जखमी

मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेल्या धडकेत २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, ६५० प्रवासी जखमी

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यानंतर रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात 250 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 650 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाकड़ून या ठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.

ओडिशातील बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ 2 जून संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडला एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेली धडक एवढी भयानक होती की एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. या अपघातात आता पर्यंत २५० जणांचा मृ्त्यू झाल्याचं वृत्त आहे. तर 650 प्रवासी हे जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच एक्स्प्रेसचे डबे पलटल्याने काही प्रावासी त्याखाली अडकण्याची देखील भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणची रेल्वे वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे.

प्रशासनाकडून याठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासा सांगण्यात आलं असून राज्यस्तरीय मदतीसाठी एसआरसीला कळवण्यात आलं आहे. घसरलेले डबे रेल्वे रुळावरुन हटवण्याचं काम सुरु असून एकाच रुळावर दोन गाड्या आल्या कशा याचा तपास रेल्वेने सुरु केला आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याने हा अपघात घडला आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर कशा आल्या याबात अधिकृत माहिती नसली तरी, सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in