होशियारपूरमध्ये भरधाव बस उलटून भीषण अपघात; ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बसला क्रेनच्या मदतीने उचलून त्याखाली दबल्या गेलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
होशियारपूरमध्ये भरधाव बस उलटून भीषण अपघात; ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Published on

होशियारपूर : पंजाबच्या होशियारपूरमध्ये सोमवारी प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. तर ३२ जण जखमी झाले. हाजीपूर रोडजवळील सगरा बस स्टँडजवळ हा अपघात झाला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दुर्घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि स्थानिकांनी मिळून बचाव कार्य सुरु केले. बसला क्रेनच्या मदतीने उचलून त्याखाली दबल्या गेलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यातील ८ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. दसुहा सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर मनमोहन सिंह यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बसचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अचानक कार समोर आल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, एकेरी रस्त्यावर बसच्या समोर अचानक कार आली. बस वेगात होती. त्यामुळे बसचालकाला नियंत्रण करण्यास जमले नाही.

logo
marathi.freepressjournal.in