रुग्णालय, हॉलसाठी रोकड देणारे प्राप्तिकरच्या रडारवर

गेल्या काही महिन्यांपासून आर्किटेक्ट व बँक्वेट हॉलवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली.
रुग्णालय, हॉलसाठी रोकड देणारे प्राप्तिकरच्या रडारवर

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक रुग्ण आपले बिल रोखीने अदा करत आहेत, तर पार्टीसाठी घेतलेल्या हॉलसाठी अनेक जण रोख रक्कम मोजत आहेत. या रोख रक्कम देणाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याची बारीक नजर आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आर्किटेक्ट व बँक्वेट हॉलवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली. रोख रकमेमुळे करचोरीचा छडा लावणे कठीण बनले आहे. मुंबई, औरंगाबाद, नाशिक व जालन्यात प्राप्तिकर विभागाने छापे मारले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व सोन्याचे दागिने सापडले होते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून रोख रकमेच्या व्यवहारावर बारीक लक्ष आहे.

अनेक छोट्या शहरांमध्ये प्राप्तिकर विभागाचे कार्यालय नाही. त्यामुळे करचोरी करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात रोख रकमेच्या व्यवहारावर बारीक लक्ष असणार आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात अनेक रुग्णांकडून पॅन क्रमांक घेतला जात नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याची योजना बनवत आहोत. त्यासाठी रुग्णालयांकडील माहितीचा वापर केला जाईल. ज्या रुग्णांनी रोख रक्कम दिली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. तर रुग्णालयांनी सांगितले की, प्रत्येक वेळी रुग्णांकडून पॅन क्रमांक घेतला जाऊ शकत नाही. कारण अनेकदा रुग्ण हे आणीबाणीच्या स्थितीत येत असतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in