बिहारमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांची घरे पेटविली

नवाडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात अनुसूचित जाती-जमातीतील ३४ जणांची घरे पेटविण्यात आली असून त्याचा गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निषेध केला आहे.
बिहारमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांची घरे पेटविली
PTI
Published on

नवाडा : नवाडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात अनुसूचित जाती-जमातीतील ३४ जणांची घरे पेटविण्यात आली असून त्याचा गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निषेध केला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांना (कायदा-सुव्यवस्था) घटनास्थळी भेट देऊन तपासावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मांजी तोला परिसरातील घरे पेटविण्यात आली, त्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणाना अटक केली आहे. जवळपास २१ घरे जळून खाक झाली आहेत. सर्व संशयितांना शक्य तितक्या लवकर ताब्यात घेण्याच्या सूचनाही नितीशकुमार यांनी दिल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. संशयितांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in