Kedarnath Landslide: केदारनाथजवळ हिमकडा कोसळला

उत्तराखंडमधील ‘बाबा केदारनाथ’ धामला सध्या भाविकांची रिघ लागली असतानाच रविवारी केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली.
Kedarnath Landslide: केदारनाथजवळ हिमकडा कोसळला

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील ‘बाबा केदारनाथ’ धामला सध्या भाविकांची रिघ लागली असतानाच रविवारी केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. हिमकडा तुटलेला बर्फ प्रचंड वेगाने खाली येत आहे.

मात्र, मंदिराच्या मागे गांधी सरोवर आहे. तुटून खाली येत असलेला बर्फाचा भाग तिथेच अडकला आहे. यामुळे मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या हजारो लोकांचे प्राण वाचले. तसेच केदारनाथ मंदिराचेही नुकसान टळले, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in