रॉयल इनफिल्डला युरोपमध्ये विकासाची प्रचंड संधी ;इलेक्ट्रीक बार्इकचे मॉडेल सादर

भारतीय बाजाराबाबत बोलतांना गोविंदराजन म्हणाले की २०११-१२ साली मध्यम वजनी गटातील मोटरबार्इकची विक्री केवळ ५० हजार होती

मिलान: येथे भरलेल्या इआयसीएमए या वार्षिक मोटरवाहन प्रदर्शनात रॉयल इनफिल्ड या भारतीय ब्रॅंडने आपली पहिली इलेक्ट्रीक बार्इक सादर केली. कंपनी २०२५ साली आपली इलेक्ट्रीक वाहने बाजारात सादर करणार आहे. रॉयल इनफिल्ड ब्रॅंडच्या सध्या मिटीऑर ३५० क्रुझर, इंटरसेप्टर ६५० आणि कॉंटिनेंटल जीटी ६५० ट्विन्स तसेच नवी कोरी हिमालयन अॅडव्हेंचर ही टुरर बार्इक, पारंपरिक बुलेट ३५०, क्लासिक ३५० अशा विविध बार्इक बाजारात उपलब्ध आहेत. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रॉयल इनफिल्डची एकूण २१०० दुकाने आहेत. तर विदेशात ८५० दुकाने आहेत. जगातील ६० देशांमध्ये रॉयल इनफिल्ड ब्रॅंडची विक्री होते. गेल्या पाच वर्षात कंपनीने वार्षिक ३७ टक्के दराने विकास साध्य केला आहे.

प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रसार माध्यमांशी बोलतांना कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी काही माहीती दिली. त्यानुसार रॉलयल इनफिल्ड या प्रख्यात मोटरसायकल ब्रॅंडला युरोपीय बाजारपेठेत प्रगती साधण्यास खूप मोठा वाव असल्याचा विश्वास रॉयल इनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी गोविंदराजन यांनी व्यक्त केला आहे. रॉयल इनफिल्ड आता चेन्नर्इ स्थित आयशर मोटर्स कंपनीचा घटक आहे. सध्या ही कंपनी संपूर्ण आशियाखंडात बार्इक विक्री करते. मध्यम वजनी गटातील मोटरबार्इक बाजारपेठेत या कंपनीचा वाटा ८.५ टक्के आहे. मिलान येथे सध्या इआयसीएमए मोटर शो या वार्षिक मोटरवाहन मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून रॉयल इनफिल्ड मोटरसायकल देखील या मेळ्यात प्रदर्शित करण्यात आली आहे. बी गोविंदराजन याप्रसंगी म्हणाले की कंपनी भारतीय बाजारात मिळालेले पुन्हा यश मिळवण्याचा विचार करीत आहे. रॉयल इनफिल्ड या मध्यम वजनी गटातील मोटरसायकलला भारतीय बाजारात उत्तम मागणी असून तो एक खास ब्रॅंड आहे. भारतीय बाजारपेठेतील हेच यश कंपनीला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळवायचे आहे. युरोपीय बाजारपेठेत या बार्इकच्या विक्रीला प्रचंड वाव आहे. कंपनी युरोपच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनासाठी स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. गोविंदराजन म्हणाले की आमची सर्व उत्पादने आता युरो फार्इव्हचे अनुपालन करणारी आहेत. आता आम्ही ब्रॅंडचे नाव करण्याच्या कामात व्यस्त आहोत. युरोपीय बाजारात या ब्रॅंडला पूर्ण स्थान देण्याचे काम आता आम्ही करीत आहोत. युरोपमध्ये सध्या ६०० मल्टीब्रॅंड किरकोळ दुकांनामध्ये रॉयल इनफिल्ड बार्इकची विक्री होत आहे. दुकांनांची संख्या आता वाढवण्यात येणार आहे. कंपनी आता युरोपीय बाजारात स्वत:ची विक्री केंद्र साखळी सुरु करण्याचा विचार करीत आहे. त्याबाबतची बाजारचाचपणी सुरु करण्यात आली आहे. युके मध्ये वितरक नेमण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भारतीय बाजाराबाबत बोलतांना गोविंदराजन म्हणाले की २०११-१२ साली मध्यम वजनी गटातील मोटरबार्इकची विक्री केवळ ५० हजार होती. तेव्हापासून आतापर्यंत विक्रीची संखया ५० हजारांवरुन ९ लाखांपर्यंत पोहोचली असून त्यात रॉयल इनफिल्डचा वाटा तब्बल ९० टक्के आहे.

logo
marathi.freepressjournal.in