Video : 'मोमोज'वरून पती-पत्नीत जुंपली; भांडण थेट पोलिसांत, नवऱ्याने 'ते' प्रॉमिस करून बायकोला मनवलं

Video : 'मोमोज'वरून पती-पत्नीत जुंपली; भांडण थेट पोलिसांत, नवऱ्याने 'ते' प्रॉमिस करून बायकोला मनवलं

पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतंच असतात. पण...

पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतंच असतात. पण, दिल्लीला लागून असलेल्या आग्रा येथून पती-पत्नीमध्ये झालेले भांडण चर्चेत आहे. कारण, चक्क मोमोज खाण्यावरून नवरा-बायकोत वाद झाल्याचे समोर आले आहे.

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, आग्रा येथील एका महिलेने पतीला बाजारातून मोमोज आणण्यास सांगितले होते. पतीने मोमोज न आणल्याने दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. मोमोज आणले नाहीत म्हणून पत्नीने पोलिसांना फोन करून नवऱ्याची तक्रार केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. त्यानंतर कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले.

आठवड्यातून दोनदा 'मोमोज'चे प्रॉमिस

समुपदेशन केंद्रात समुपदेशन केल्यानंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली. पतीने आपल्या पत्नीला आठवड्यातून दोनदा मोमोज खायला देण्याचे आश्वासन दिले तेव्हा कुठे दोघांमधील भांडण संपले. काही दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाल्याचेही समजते.

आता या अनोख्या भांडणाची सोशल मीडियावर चर्चा आहे. गेल्या महिन्यातच दिल्लीमध्ये मोमोज खाणाऱ्या एका ग्राहकाने एक्स्ट्रा चटणी मागितल्यावरून वाद झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकावर चाकूने वार करून पळ काढल्याची घटना घडली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in