माझ्यावर अतिक अहमतप्रमाणे हल्ला होऊ शकतो- समीर वानखेडे

माझ्यावर अतिक अहमतप्रमाणे हल्ला होऊ शकतो- समीर वानखेडे

माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला होऊ शकतो. मीडियाच्या रुपाने देखील हल्ला होऊ शकतो, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.

आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण देशभर गाजताना दिसत आहे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची या प्रकरणी सीबीआय चौकशी होत आहे. अभिनेता शाहरुख खान याच्याकडून त्याचा मुलगा आर्यन खान याला सोडण्याच्या बदल्यात 25 कोटींची खंडणी मागल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयकडून परवा वानखेडे यांची 5 तास चौकशी करण्यात आली. तसेच काल देखील त्यांना चौकशीला सामोर जावे लागले. सीबीआयकडून करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या तापासानंतर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणी आधी वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच ते मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत. मला सुरक्षा द्या, अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला होऊ शकतो. मीडियाच्या रुपाने देखील हल्ला होऊ शकतो, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कायदेशीर असलेल सगळे मी न्यायालयात सांगणार आहे. सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या, असे म्हणत त्यांनी सीबीआयला शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलातना ते म्हणाले की, सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर असून मी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी करणार आहे. तसेच आपल्याला सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाया प्लॅटफार्मवर धमक्या येत अल्याचे देखील ते म्हणाले आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी एकत्रित चर्चा करणार असल्याचेही वानखेडे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी आपण सीबीआयला तपासात सहकार्य करणार असल्याचेही सांगितले तसेच त्यांनी त्यांचा न्यायालयावर पुर्ण विश्वास असून त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान याची तुरुंगातून सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

काय आहे अतिक अहमद प्रकरण?

उत्तर प्रदेशातील कुख्यात गॅंगस्टर तसेच उमेशपाल ह्तयाकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराज मेडिकल कॉलेजबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना वेद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील मेडीकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in