तुम्ही सांगाल ती जमीन मंदिरासाठी तुम्हाला देतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा

भारत आणि यूएई हे दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जात आहेत. संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे.
तुम्ही सांगाल ती जमीन मंदिरासाठी तुम्हाला देतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा

अबूधाबी : २०१५ मध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने अबुधाबीमध्ये मंदिराचा प्रस्ताव मांडला होता. क्षणाचाही वेळ न दवडता संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी होकार दिला. ज्या जागेवर तुम्ही बोट ठेवला, ती सगळी जमीन तुम्हाला मंदिरासाठी देतो, असा शब्द राष्ट्राध्यक्षांनी दिला. अबुधाबीमधील भव्य आणि दिव्य मंदिराच्या उद्घाटनाची ऐतिहासिक वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

१४ फेब्रुवारी रोजी हिंदू मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीत पोहोचले आहेत.

झायेद स्पोर्ट्स सिटी येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हजारो प्रवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे कौतुक करताना मंदिर निर्माणासाठी केलेल्या सहकार्याबाबतची आठवण सांगितली. तसेच भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

भारत आणि यूएई हे दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जात आहेत. संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. यूएई सातव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे. दोन्ही देश 'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ बिझनेस डूइंग' यावर खूप सहकार्य करत आहेत. दोन्ही झालेले करार याच वचनबद्धतेला पुढे नेत आहेत. अर्थव्यवस्थांचा विस्तार करत आहोत. तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देश सातत्याने मजबूत होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जगातील असा कोणता देश आहे ज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे? तो कोणता देश आहे, तो आपला भारत आहे. स्मार्टफोन डेटा वापरण्यात जगात सर्वांत वरचा देश कोणता आहे, तो आपला भारत आहे. जगात सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या देशात होते? आपल्या भारत होते. इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता, तो आपला भारत आहे. जगातील सर्वांत मोठा मोबाईल निर्माता कोणता देश आहे? तो आपला भारत आहे. जगातील तिसरा सर्वांत मोठा स्टार्टअप इकोसिस्टम असलेला जगातील कोणता देश आहे, तो आपला भारत आहे. जगातील कोणता देश पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला, तो आपला भारत आहे. जगातील असा कोणता देश आहे जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, तो आपला भारत आहे. जगातील असा कोणता देश आहे ज्याने एकाच वेळी १०० उपग्रह पाठवण्याचा विक्रम केला आहे, तो आपला भारत आहे. जगातील कोणता देश आहे ज्याने स्वतः ५ जी तंत्रज्ञान विकसित केले, तो आपला भारत आहे, असे सांगत भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी प्रवासी भारतीयांसमोर ठेवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in