"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

मी माझ्या घराच्या दरवाजावर 'जय श्री राम' झेंडा लावला. यानंतर पक्षात माझा तिरस्कार करणे सुरू झाले...
"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

नवी दिल्ली : राधिका खेरा यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्या पदाचा आणि सदस्यत्वा रविवारी ५ मे रोजी राजीनामा दिला आहे. यानंतर राधिका यांनी आज ६ मे रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी राधिका यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'त त्यांच्यासोबत झालेले गैरवर्तन आणि अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर पक्षांतर्गत झालेला त्रास या सर्वमुद्द्यांवर पत्रकार परिषदेत उघडपणे बोलल्या आहेत. यानंतर राधिका यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेत गैरवर्तनाबाबत राधिका म्हणाल्या, "भारत जोडो न्याय यात्रा ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये पोहोचल्यानंतर काँग्रेसचे मीडिया अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांच्याकडे मी बोलण्यासाठी गेले होते. त्यावेळी शुक्ला यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले आणि कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता. त्यावेळी मी जोरात ओरडले, परंतु, माझ्या मदतीसाठी कोणीही आले नाही. मी जोराने दारवाजा ढकलून तेथून बाहेर पडले आणि प्रदेश सरचिटणीस यांच्या खोलीत गेले तर, ते बसले होते. त्यांनी मला विचारले देखील नाही की, काय झाले?" असा गंभीर आरोप राधिका यांनी केला आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यापैकी कोणीही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही राधिकांनी व्यक्त केली.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आल्यानंतर काँग्रेस पक्षात विरोधाचा सामना करावा लागल्याचेही राधिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगतिले. राधिका म्हणाल्या, "मी नेहमीच ऐकले की काँग्रेस रामविरोधी, सनातनविरोधी आणि हिंदूविरोधी आहे. पण, मला कधीच विश्वास बसला नाही की, महात्मा गांधी प्रत्येक बैठकीची सुरुवात 'रघुपती राघव राजा राम'ने करत होते. मी माझ्या आजीसोबत रामाचे दर्शन घेतले. यानंतर मी माझ्या घराच्या दरवाजावर 'जय श्री राम' झेंडा लावला. यानंतर पक्षात माझा तिरस्कार करणे सुरू झाले", असेही त्यांनी यावेळी सांगितले. मी जेव्हा राम मंदिर दर्शनाचे फोटो पोस्ट केल्यानंतर मला पक्षाकडून विचारण्यात आले की, निवडणुकीदरम्यान तू अयोध्येला का गेलीस?

भूपेश बघेल यांनी मला छत्तीसगढ सोडायला सांगितले

"मी पहिल्यांदा सचिन पायलट यांना फोन केला. पण, ते व्यस्त असल्याचे त्यांच्या पीएने सांगितले होते. यानंतर सचिन यांचा पीए तिथल्या लोकांशी बोलून सांगितले की, या प्रकरणी कुठेही तोंड उघडू नकोस, असे मला सचिन पायलट यांच्या पीएने सांगितले. यानंतर मी भूपेश बघेल, पवन खेरा आणि जयराम रमेश यांना फोन केला होता. पण, त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही. यानंतर मला भूपेश बघेल यांचा फोन आला, त्यावेळी त्यांना सांगितले की, मला राजकारण सोडायचे आहे. परंतु, भूपेश बघेल मला बोलले की, छत्तीसगढ सोड. यानंतर माझ्या लक्ष्यात आले की, हा एक षडयंत्रचा भाग आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in