"ते मला मारुन टाकतील असे वाटले होते", पृथ्वी शॉ 'त्या' वादावर पहिल्यांदाच बोलला

मी 7-8 मित्रांसह मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमधील बॅरल क्लबमध्ये होतो. यावेळी शेजारच्या टेबलावर बसलेले 4-5 जण सेल्फी घेण्यासाठी माझ्याकडे आले, मीही तयार झालो. पण, त्यांनी काढलेले सेल्फी हे अस्पष्ट असल्याने ते पुन्हा सेल्फी घेण्यासाठी आले. त्यामुळे मी पुन्हा सेल्फी घेतला. यानंतर एक जोडपे माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि....
"ते मला मारुन टाकतील असे वाटले होते", पृथ्वी शॉ 'त्या' वादावर पहिल्यांदाच बोलला

भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या वर्षी मुंबईच्या एका पबबाहेर झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रारही झाली. आता अखेर पृथ्वीने त्या रात्रीच्या सर्व घटनेचा खुलासा केला आहे.

पृथ्वी शॉने सांगितले की, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि तिचा मित्र शोभित ठाकूर यांनी आधी त्याच्या BMW कारवर हल्ला केला. यानंतर त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला. शॉने केलेल्या तक्रारीनंतर सपना गिल आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली होती. मात्र, तीन दिवसांनी जामीनावर त्यांची सुटका झाली.

पृथ्वी शॉने सांगितला घटनाक्रम-

"मी 7-8 मित्रांसह मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमधील बॅरल क्लबमध्ये होतो. यावेळी शेजारच्या टेबलावर बसलेले 4-5 जण सेल्फी घेण्यासाठी माझ्याकडे आले, मीही तयार झालो. पण, त्यांनी काढलेले सेल्फी हे अस्पष्ट असल्याने ते पुन्हा सेल्फी घेण्यासाठी आले. त्यामुळे मी पुन्हा सेल्फी घेतला. यानंतर एक जोडपे माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला न विचारता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यानंतर मॅनेजरने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. काही वेळाने मीही बाहेर पडलो. यावेळी सपना गिल बेसबॉलची बॅट घेऊन उभी होती. ते सर्वजण माझी बाहेर वाट पाहत होते. ते सामान्य माणसांसारखे दिसत नव्हते, ते दुसऱ्याच काहीतरी विचारात होते". असे पृथ्वी शॉने सांगितले.

माझ्या कारवर हल्ला केला-

"यानंतर मी CISF चेक पोस्टवर कारचा वेग कमी करत असताना त्यांनी माझ्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला. त्यांनी विंडशील्डवर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी तीन ते चार वेळेस हल्ला केला. मला काच फुटण्याची भीती वाटत होती. यामुळे मला तिच्या हातातून बॅट हिसकवायला बाहेर पडावे लागले, नाहीतर तिने माझी कार पूर्णपणे खराब केली असती. मी तिच्या हातातून बॅट हिसकावून घेतली. यानंतर तिने पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओचा केवळ तेवढाच भाग पोस्ट करण्यात आला होता." पृथ्वी पुढे म्हणाला की, "मला हे सगळं सोडून त्या ठिकाणाहून निघायचे होते, कारण ते काहीतरी करु इच्छित होते, आणि माझी बिल्कुल इच्छा नव्हती की यात माझे नाव ओढले जावे. त्यामुळे मी माझ्या मित्राच्या कारमधून तेथून निघालो. माझी बीएमडबल्यू तिथेच होती, मी तिला आणेल असे माझ्या मित्राने मला सांगितले."

त्यांनी पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग केला-

"मी निघाल्यानंतर या जोडप्याने त्यांच्या कारने माझ्या कारचा पाठलाग करायला सुरुवात केली. यानंतर माझ्या मित्रांनी माझी कार त्यांच्या कारसमोर लावली, ज्याला त्यांच्या कारने मागून धडक दिली. यानंतर काही दुचाकीस्वारांनी अंधेरी जवळ माझी कार थांबवली आणि बॅट मागच्या काचेवर आदळली, आणि ती लगेच फुटली. यावेळी मी माझ्या मित्रांशी फोनवर बोलत होतो. मला कळून चुकले की ते माझी कार पूर्णपणे फोडून टाकतील, त्यामुळे मी मित्रांना कार सरळ पोलीस ठाण्यात न्यायला सांगितली. दुचाकीस्वार हुशार होते, ते पोलीस ठाण्याच्या आधी असलेल्या ट्राफिक सिग्नलवर थांबले, पण, ते जोडपे थांबले नाही, त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत माझ्या कारचा पाठलाग केला."

पोलिसांसमोर कथानक बदलला-

"इथे आल्यावर मात्र त्यांनी पूर्ण कथानक बदलला, माझ्या कारवर हल्ला केलेल्या मुलीने आमच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. माझ्या मित्रांनी त्या मुलीला साधा स्पर्श देखील केला नाही, तुम्ही त्या ठिकाणचे सर्व कॅमेरे तपासू शकता", असेही तो म्हणाला.

मला वाटले होते ते मला मारुन टाकतील-

"मला माझ्या जीवाची खरोखर भीती वाटली होती, मला वाटले होते की, ते मला मारुन टाकतील. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका घाबरलो होतो. माझे नाव यात ओढले जाईल हे माहीत असतानाही आम्ही तक्रार दाखल केली. कारण, मला माहीत होते की आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही", असे पृथ्वी शॉ याने न्यूज 24 शी बोलताना सांगितले.

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली -

पोलिसांनी न्यायालयासमोर सर्व पुरावे सादर केल्यानंतर गिल आणि तिच्या मित्राने केल्या आरोपांतून पृथ्वी शॉची निर्दोष मुक्तता केली गेली. पृथ्वीने केलेल्या विधानाची मुंबई एअरपोर्ट रोड पोलिसांनी पुष्टी केली असून त्याने विनयभंग किंवा गैरवर्तन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे, सांगितले. तसेच, CISF टॉवरच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर क्रिकेटरच्या कारचा पाठलाग करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in