२४ वर्षापूर्वीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी माफ करणार नाही - गँगस्टर बिश्नोई

२०२० मध्ये बिश्नोई टोळीने सलमानला मारण्यासाठी राहुल उर्फ ​​बाबा नावाच्या शार्प शूटरला पाठवले होते
२४ वर्षापूर्वीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी माफ करणार नाही - गँगस्टर बिश्नोई
ANI

गेल्या महिन्यात अभिनेता सलमान खानला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला धमकी दिली आहे. २४ वर्ष जून्या काळवीट हत्या प्रकरणी बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. जोपर्यंत सलमान काळवीट हत्या प्रकरणी सार्वजनिक माफी मागत नाही तोपर्यंत सलमानला माफ करणार नाही असं, बिश्नोई म्हणाला असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर

दिल्ली स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, पंजाबच्या फिरोजपूरमधील एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बिश्नोईने १९९८ च्या काळवीटाच्या हत्येचा सलमान खानवर बदला घेण्याची घोषणा केली होती. तेव्हा तो पहिल्यांदा चर्चेत आला होता. जून २०१८ मध्ये, जेव्हा बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य संपत नेहराला बंगळुरुमधून अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याने हे देखील सलमान खानला मारण्याचा डाव असल्याचे जाहीर केले होते. २०२० मध्ये बिश्नोई टोळीने सलमानला मारण्यासाठी राहुल उर्फ ​​बाबा नावाच्या शार्प शूटरला पाठवले होते. त्याने सलमानच्या घरापासून शूटिंग लोकेशनपर्यंत रेकी केली होती. सलमान खानला काळवीट प्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून २०१८ मध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in